एरंडोल प्रतिनिधी । कासोदा येथील भडगाव रोड विश्राम नगर जवळील लिटिल व्हॅली प्री. प्रायमरी स्कुलमध्ये दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, शाळेचे संचालक अशोक पाटील यांनी ध्वजारोहनासाठी परिसरातील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, पी.एस.आय. यांना ध्वजारोहनांसाठी आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्याहस्ते ध्वजारोहन करून तिरंग्यास मानवंदना देऊन त्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी भेट देत सत्कार केला. व शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी देशभक्तीपर गीत नृत्य भारत देशाविषयी लहान मुलांनी इंग्लिशमध्ये भाषण दिले. आजच्या भारताच्या प्रगतीवरील संभाषण सादर करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात स्वतः उभे राहून भव्य असा भारताचा नकाशा तयार करण्यात आला होता. परिसरातील आलेल्या सैनिकांनी शाळेच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन असल्याने आपल्या मोठ्या भावांना राख्या बांधून त्यांना सीमेवर राहून आमचे व भारत देशाचे रक्षण करतात. ही राखी नसून रक्षा कवच आहे. आपण देश सेवा करत आहेत. दृष्टांचा नाश करावा, अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून बाळगतो असे संबोधले. सैनिक बांधवांनी सर्वांचे कुतुहलाने आभार मानले व आपले मनोगत व्यक्त केले. व विद्यार्थ्यांना देशसेवा करण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा, मोठे व्हा व असे सांगून त्यांना उत्साही केले.
कासोदा येथील सेवानिवृत्त नायब सुभेदार गोविंद बागुल, सीमेवर कार्यरत असलेले कासोदा येथील अविनाश ठाकरे, विजय भदाणे, महेंद्र पवार, विजय चौधरी, संदीप पाटील, भुषण शिंपी, दीपक पाटील, जितेंद्र पाटील आदी सैनिक व पालक शिक्षक वृंद विद्यार्थी-विद्यार्थिंनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने लिटिल व्हॅली प्री प्रायमरी स्कूल येथे ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित होते.