पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यशाहीर प्रशिक्षण शिबिर – २०२५ चे उद्घाटन १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता संत सखाराम महाराज संस्थान वाडी येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात तब्बल ४८ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. हे शिबिर २७ मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून शिवनारायण देवराम जाधव उपस्थित होते. तसेच चिटणीस एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर, सरपंच प्रतीक्षा काटकर व शिबिर संचालक शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांचे सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, तसेच सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिबिरार्थी शाहीर सुरज राऊत व नवोदित विद्यार्थ्यांनी दमदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. उद्घाटन भाषणात शिवनारायण जाधव यांनी महाराष्ट्रातील शाहिरी लोककलेला नवसंजीवनी देण्याचे कार्य या शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले. प्राचार्य किरण काटकर यांनी विद्यार्थ्यांना शाहिरी क्षेत्राच्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व पटवून दिले. शिबिर संचालक शाहीर शिवाजीराव पाटील यांनी विविध शाहिरी परंपरा आणि लोककलांचे वैशिष्ट्य स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “शाहिरी हा केवळ उद्योग नसून जनसेवेचे माध्यम आहे. वीर महापुरुषांच्या पराक्रमाची गाथा तालवाद्यांच्या सहाय्याने सोप्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचवता येते.”
वाजीराव पाटील यांनी विविध शाहिरी परंपरा आणि लोककलांचे वैशिष्ट्य स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “शाहिरी हा केवळ उद्योग नसून जनसेवेचे माध्यम आहे. वीर महापुरुषांच्या पराक्रमाची गाथा तालवाद्यांच्या सहाय्याने सोप्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचवता येते.”
या कार्यक्रमाला तालुक्यातील आणि गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सागर पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र भांडारकर, राजेंद्र जोशी, नामदेव पाटील, मिलिंद दुसाने, रामसिंग राजपूत, सुरज राऊळ, भूषण पवार, अशोक पाटील, वेदराज कपाटे, दिगंबर पाटील, ज्ञानेश्वर महाजन, दीपक पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाहीर राजेंद्र जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार देखील त्यांनी मानले. शिबिराच्या माध्यमातून नवोदित विद्यार्थी शाहिरी कलेची तंत्रे आत्मसात करून पुढे जाणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.