जळगाव प्रतिनिधी । मनपात भाजपाची सत्ता नसतांना आमदार सुरेश भोळे यांनी दिव्यांग बांधवांना दिलेला शब्द पाळला असून येत्या आठवडाभरात शहरातील सतरा दिव्यांगांना हक्काच्या घराचा ताबा देण्यात येणार आहे. आ. भोळे यांनी आज मनपा स्थायी सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना स्वत: ही माहिती दिली.
अपंग साधना संघाच्या वतीने 17 दिव्यांग बांधवांना घरकुल योजना मिळावी यासाठी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी कोणतीही समन्वयाची भूमीका घेतली नाही. मात्र जळगाव महानगरपालिकेत भाजपाची सत्ता नसतांना आमदार राजूमामा भोळे यांनी मध्यस्थी घेवून न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला होता. आज बुधवारी महानगर पालिकेत स्थायी सभेत आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थित महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त आणि उपायुक्त यांनी या 17 दिव्यांग व्यक्तीसाठी घरकुल योजना तत्काळ मंजूर करून येत्या दोन-तीन दिवसात करारनामा करून आठवड्याभरात त्यांना हक्काची घरे मिळणार आहे. अशी माहिती आमदार राजूमामा भोळे यांना ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना सांगितले. यावेळी या सभेत स्थायी समितीचे सदस्य आणि नगरसेवक व अधिकारी आदीची उपस्थिती होती.