यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाडे येथील आदिवासी समाजातील कार्यकर्ते राजु तडवी यांची यावल तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
परसाडे तालुका यावल येथील आदीवासी कुटुंबातील सामाजीक कार्यकर्ते तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श ग्रामसेवक मजीत अरमान तडवी यांचे बंधु राजु तडवी यांची संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाद्वारे गठीत करण्यात आलेल्या समितीच्या मागसवर्गीय अनुसुचित जाती जमातीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान राजु तडवी यांची संगांयोच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरिष चौधरी, काँग्रेसचे जिल्हा परिषदचे गटनेते तथा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, शिसेनेचे तालुका अध्यक्ष रविन्द्र सोनवणे, आर के चौधरी, नावरे गावाचे माजी सरपंच समाधान पाटील, परसाडे ग्रामपंचायत सरपंच बबीता तडवी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, कॉंग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष बशीर तडवी आदीनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे.