Home Cities भुसावळ भुसावळात रजनीताई सावकारे यांनी घरोघरी जाऊन केला प्रचार

भुसावळात रजनीताई सावकारे यांनी घरोघरी जाऊन केला प्रचार

0
111

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रजनीताई संजय सावकारे यांच्या प्रभागनिहाय दौऱ्याला आज नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एकजूट पाहून परिसरात निवडणूक उत्साह आणखी वाढताना दिसत आहे.

आज दिनांक २५ नोव्हेंबर, मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीच्यावतीने भुसावळ नगरपरिषदेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीच्या प्रचार मोहिमेला गती देण्यात आली. प्रभाग क्रमांक २२ आणि २५ मध्ये झालेल्या या प्रचार दौऱ्यात पिंटू ठाकूर आणि माधुरीताई फालक यांच्या नेतृत्वाखाली घराघरात भेटी घेऊन सौ. रजनीताई संजय सावकारे यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले.

दौऱ्यादरम्यान नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांविषयी सकारात्मक भावना व्यक्त करत त्यांना उत्साहाने प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न मांडले. त्याचबरोबर, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेतील विकासाभिमुख दृष्टीकोन, पारदर्शक प्रशासन आणि भुसावळच्या सर्वांगीण प्रगतीसाठी रजनीताई सावकारे यांच्या नेतृत्वाची गरज अधोरेखित केली.

या प्रचार मोहिमेला भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकजुटीचे हे प्रदर्शन महायुतीला निवडणुकीत मजबूत गती देणारे ठरले असून, आगामी दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.


Protected Content

Play sound