जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलची नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा घोषित करण्यात आला असून नूतन अध्यक्ष राजेश चौधरी यांना प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार तर मानद सचिव विलास देशमुख यांना जितेंद्र बरडे यांनी पदभार सुपूर्द केला.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे गव्हर्नर इलेक्ट डॉ.आनंद झुनझुनवाला, सहप्रांतपाल संगीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळत्या अध्यक्ष प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव जितेंद्र बरडे यांनी वर्षभरातील 56 प्रकल्प व 51 मिटींगचा कार्य अहवाल सादर केला. क्लब बुलेटीनचे प्रकाशन व रोटरीकार्डचे वितरण यावेळी करण्यात आले. अध्यक्ष राजेश चौधरी यांनी नूतन कार्यकारिणी घोषित केली. त्यात कोषाध्यक्ष दिलीप लुणिया प्रेसिडेंट इलेक्ट विपूल पारेख, सार्जंट अॅट आर्म्स कल्पेश शहा, आयपीपी प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार, तर संचालक म्हणून डॉ. नरेंद्र जैन, सीए अनिलकुमार शहा, विष्णू भंगाळे, डॉ. राहूल मयुर, अॅड.श्रीओम अग्रवाल, महेंद्र गांधी, मिलन मेहता, कल्पेश दोषी, संदीप मुथा, रविंद्र वाणी, अजय जैन, अनिल सांखला, राजेंद्र पिंपरकर, रामेश्वर थोरात, प्रा. स्नेहलता परशुरामे आदिंचा समावेश आहे. क्लब मधून डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स म्हणून निवड झालेल्या महेंद्र रायसोनी, डॉ. अशोक पाध्ये, शामकांत वाणी, प्रा.डॉ. अपर्णा भट-कासार, डॉ. अंजुम अमरेलीवाला व संतोष अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. झुनझुनवाला यांच्या हस्ते दिनेश थोरात व गणेश नाईक या दोन नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. प्रांतपांलाच्या संदेशाचे वाचन सहप्रांतपाल संगीता पाटील यांनी केले. डिस्ट्रीक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ.आनंद झुनझुनवाला यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. राहुल मधुर यांनी तर परिचय प्रा. स्नेहलता परशुरामे व महेंद्र गांधी यांनी करुन दिला. उत्कृष्ट कार्याबद्दल प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार व जितेंद्र बरडे यांचा स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नूतन अध्यक्ष, सचिवांच्या कुटूंबीयांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी अनुश्री चौधरी हिने गणेश वंदना सादर केली. दीपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव आणि रोटरी सेंट्रलच्या सदस्यांची उपस्थिती होती.