Home धर्म-समाज क्षत्रिय मराठाच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी रजत शिंदे

क्षत्रिय मराठाच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी रजत शिंदे

0
49

भुसावळ, प्रतिनिधी । क्षत्रिय मराठा संघटनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी रजत शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांना नियुक्ती पत्र प्रदेश प्रमुख विजय मोहिते यांच्या नियोजित राज्य दौऱ्या वेळी देण्यात येणार आहे.

क्षत्रिय मराठा परिवाराने रजत शिंदे यांच्या सामाजिक कार्याची व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची जळगाव जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्तीची घोषणा गणेश चतुर्थीच्या दिवशी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात क्षत्रिय मराठा संघटन जोमाने वाढेल व मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

नियुक्ती पत्रावर प्रमुख अविनाश सूर्यवंशी, प्रदेश प्रमुख विजय मोहिते व प्रदेश सचिव जितेंद्र रौद्रळे पाटील यांची स्वाक्षरी आहे. रजत शिंदे यांच्या नियुक्तीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound