जळगाव (प्रतिनिधी) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी राजर्षीं शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार (महसुल) मंदार कुलकर्णी, तहसीदार (पुरवठा) प्रशांत कुलकर्णी यांचेसह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.