मुंबई प्रतिनिधी । दलीत पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन झाले असून त्यांच्या माध्यमातून एक सच्चा आंबेडकरी विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.
राजा ढाले यांचे आज सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखक व राजकारणी होते. दलित पँथर नावाची एक सामाजिक संघटना ढाले यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने स्थापन केली होती. त्याअगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते. त्यांनी एकदा निवडणूकही लढवली असली तरी यात त्यांना यश लाभले नाही. त्यांच्या निधनाने सच्चा आंबेडकरी विचारवंत हरपल्याची सहवेदना व्यक्त करण्यात येत आहे.