शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यादाच आनंद आश्रमात जाणार राज ठाकरे

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला १२ मे रोजी रविवारी भेट देणार आहे. २००६ साली शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यादाच राज ठाकरे ठाणे येथील आनंद दिघे यांच्या आश्रमला भेट देणार आहे. १२ मे रोजी रविवारी ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा होणार आहे.
त्याआधी ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख हेमंत पवार आणि पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात राज ठाकरे यांचे ठाण्यात स्वागत केले जाणार आहे. दिघे यांच्या आश्रमात देखील जोरदार स्वागताची तयारी करण्यात येत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे वास्तव्यास होते. याच आश्रमातून आनंद दिघे पक्षाचा कारभार करत असत. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक या आश्रमात येऊ लागले.

Protected Content