मुंबई (प्रतिनिधी) पाच वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरे न गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या अभूतपूर्व पत्रकार परिषदेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांची पत्रकार परिषद… ‘मौन की बात’!, असे ट्विट करत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.
अमित शाह यांनी शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर उपस्थित होते. पण त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ही पत्रकार परिषदत पक्षाध्यक्षांची असल्याने पक्षशिस्तीनुसार मी उत्तरे देणे योग्य नाही, असे कारण त्यांनी दिले. यावरुन राज ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. “पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात”, असे राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.