Home राजकीय राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला चोपले

राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला चोपले


मुंबई (वृत्तसंस्था) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या अंबरनाथ येथील एका तरूणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे.

 

 

अंबरनाथच्या पूर्वेकडील धारा रेसिडेन्सी संकुलात शनिवारी हा प्रकार घडला. संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यालयात आणून संदीप तिवारीला उठाबश्या काढायला लावल्या आणि मारहाण केली. दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या घटनेचे समर्थन केले असून, “टीका करावी, टीका करणे हा लोकशाहीचा हक्क आहे पण जर कमरेखालची टीका कोणी करणार असेल तर त्यांना असाच धडा शिकवला जाईल, असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound