पाचोरा प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील बर्याच गावांमध्ये आज पहाटे पावसाचे आगमन झाले आहे.
आज पहाटे आलेल्या पावसामुळे लहान-मोठ्या नाले व गटारी वाहून निघाले. याआधी तालुक्यात १४ मिमी पाऊस झाला होता. तर आज सकाळी दहा वाजेपर्यत १० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे. पावसामुळे कडाक्याच्या उन्हापासून मुक्तता मिळणार असल्यामुळे वातावरणात प्रसन्नता जाणवत आहे. यातच रविवारी पाऊस आल्याने चाकरमानी मंडळी आणि बच्चे कंपनीदेखील खुश असल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतकर्यांच्या दृष्टीकोनातून अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे अद्याप पेरण्यांना वेग आलेला नाही.