जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या आसोदा भादली शिवारातील रेल्वे रूळावर एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा भादली शिवारातील रेल्वे रूळावर एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह सकाळी 9 वाजेच्या सुमारास आढळून आला. ही आत्महत्या की रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला हे अद्या स्पष्ट झालेले नाही. मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आले असून ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे. रेल्वे प्रशानाच्या खबरीवरून तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.