ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर छापे

indira jaisingh

 

मुंबई/दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने आज सकाळी छापे टाकले. ‘लॉयर्स कलेक्टिव्ह’ या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीत अनियमितता असल्याचा या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्या संदर्भातले वृत्त एएनआयने दिले आहे.

 

आनंद ग्रोव्हर आणि इंदिरा जयसिंग हे दोघेही लॉयर्स केलक्टिव्ह नावाची संस्था चालवतात. इंदिरा जयसिंग या २००९ ते २०१४ या कालावधीत एडिशनल सॉलिसिटर जनरल या पदावर कार्यरत होत्या. या कालावधीत लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेसाठी त्यांनी इतर देशांमधून निधी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच त्यांनी या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही लॉयर्स कलेक्टिव्ह विरोधात करण्यात आलेल्या याचिकेत आहे. याप्रकरणी सीबीआयकडे या दोघांविरोधात केस दाखल करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संस्थेचे लायसन्सही रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर सीबीआयने जयसिंग आणि ग्रोव्हर यांच्या घरावर छापे मारून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

 

Protected Content