जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथे बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या एकावर तालुका पोलीसांनी छापा टाकून ६०४ रूपये किंमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा येथील ढंढोरे नगरातील एक तरूण बेकायदेशीर दारूची विक्री करत असल्याची माहिती तालुकापोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी संशयित आरोपीवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्यात. शनिवारी २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार, पोहेकॉ साहेबराव पाटील, धमेंद्र ठाकूर आणि पोलीस नाईक विलास शिंदे यांनी कारवाई करत संशयित आरोपी योगेश श्रावण मरसाळे (वय-२७) रा. ढंढोरे नगर आसोदा ता. जि.जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून विनापरवाना व बेकायदेशीरीत्या टॅन्गो पंच दारूच्या ६०४ रूपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. शनिवारी रात्री उशीरा पोलीस नाईक विलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी योगेश मरसाळे याच्या विरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सतिष हारनोळ करीत आहे.