हाथरस । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हाथरस येथील पिडीतेच्या गावी पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांनी पिडीतेच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान प्रशासनानं राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह फक्त ५ जणांना हाथरसला जाण्यास परवानगी दिली होती. याशिवाय कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनाचं पालन करण्यासाठी सांगण्यात आलं होते.
दरम्यान, राहुल आणि प्रियांका गांधी दोन दिवसांपूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. परंतु दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील परी चौकात रोखून पुन्हा दिल्लीला पाठवले. तिथे राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की देखील झाली होती. यापार्श्वभूमीवर राहुल आणि प्रियांका गांधी हे हाथरसला जायला निघाले, तेव्हा हाथरसकडे जाणाऱ्या रस्त्यावर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.