Home राजकीय राहुल गांधी बालिश नेता – खा. पूनम महाजन

राहुल गांधी बालिश नेता – खा. पूनम महाजन


2 09 01 17 poonam mahajan 1 H@@IGHT 474 W@@IDTH 800

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपा खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चक्क बालबुद्धी असलेला नेता, असे संबोधले आहे. राहुल ५० वर्षांचा असला तरी बालबुद्धी असलेला नेता आहे, अशी व्यंगात्मक टीपण्णी त्यांनी केली आहे. पूनम यांनी राहुल गांधींच्या मुंबईतील सभेचा दाखला देत कुर्ला येथील गृहप्रकल्पाच्या कार्यक्रमात त्यांच्यावर ही टीका केली.

 

 

राहूल गांधींनी आधी स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर इंच यामधला फरक सांगावा. मी माझं नाव बदलून दुसरे काम करेल, असे आव्हानही महाजन यांनी राहुल गांधींना दिलेय. राहुल यांनी मुंबईतील सभेत बोलताना, ५०० स्केअर फूटांची घरे देण्याचे आश्वासन मुंबईकरांना दिले होते. त्यावरुन, पूनम यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे.

 

 

मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. जनतेला घरे देण्यासाठी ते प्रयत्नशील असून प्रत्येक बाबींचा पाठपुरावा करत आहेत. २०२२ पर्यंत सर्वांना घरं हा प्रकल्प म्हणजे मुंबईला वर्ल्ड क्लास सिटी बनविण्याची चावी असल्याचे सांगत पूनम यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं. राहुल गांधी मोदींसोबत वाद विवाद घालण्याची भाषा करतात, आधी माझ्यासोबत वाद घालून दाखवा म्हणावे, असे आव्हानही पूनम यांनी दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound