Home राजकीय आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देणार : राहुल गांधी

आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देणार : राहुल गांधी


rahul gandhi

हैदराबाद (वृत्तसंस्था) केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिले आहे. विजयवाडा येथे प्रचार सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिले. यापूर्वीही फेब्रुवारीमध्ये राहुल यांनी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती.

 

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, हे केवळ काँग्रेस किंवा मनमोनह सिंग यांनी दिलेले आश्वासन नाही. तर हे देशाने दिलेले आश्वासन आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देऊ. मोदी गेल्या पाच वर्षापासून देशाची सत्ता सांभाळत आहेत. त्यांनी त्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही. तरीही आंध्रप्रदेशातील राजकीय पक्षांनी मोदींकडे ही मागणी आक्रमकपणे का लावून धरली नाही, याचं मला आश्चर्य वाटते, असेही राहुल म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound