Home Cities अमळनेर राहिला व अनुजाला साईरत्न पुरस्कार प्रदान

राहिला व अनुजाला साईरत्न पुरस्कार प्रदान

0
29

अमळनेर प्रतिनिधी । येथील साई इंग्रजी अकॅडमीतर्फे राहिला फातेमा मो इद्रिस आणि अनुजा शिरोडे यांना साईरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

इंग्रजी विषयातील अमळनेर तालुक्यातील नामांकित अकॅडमी म्हणून ख्यात असणार्‍या साई अकॅडमीच्या वतीने इंग्रजी विषयातील नैपुण्य मिळवणार्‍याचा दरवर्षी साई रत्न पुरस्काराने सन्मानित मान्यवरांच्या हस्ते केले जाते. यावर्षी अत्यंत बहुमानाचा इयत्ता दहावीच्या विदयार्थीनसाठी प्रेरणादायी ठरणारा साई रत्न पुरस्कार २०१९चे मानकरी राहिला फातेमा मो. इद्रीस व अनुजा शरद शिरोडे यांना सामाजिक कार्यकर्त्या अँड तिलोत्तमा पाटील, साई इंग्रजी अँकडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर व अँड मगर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अँड. तिलोत्तमा पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात नवनवीन पुस्तके वाचून स्पर्धा परीक्षा कडे वळावे. भरपूर मेहनत करा,यश निश्‍चितच मिळेल असे सांगत त्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound