फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे राज्याचे महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील हे नुकतेच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावल भाजपा व फैजपूर शहर भाजपातर्फे नरेंद्र नारखेडे व शहराध्यक्ष अनंत नेहते यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, हिरालाल चौधरी, सरचिटणीस विलास चौधरी, उज्जेनसिंग राजपूत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे जंगी स्वागत केले.
यावेळी जिल्ह्यात पसरलेल्या लम्पीस्कीन या आजाराने बाधित जनावरांची तपासणी करण्यात आली असून लम्पि आजाराने बाधित व मृत झालेल्या पशु मालकांना शासनाने नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी नरेंद्र नारखेडे यांनी केली.
याप्रसंगी डॉ. कुंदन फेगडे, भास्कर चौधरी, नितीन राणे, निलेश राणे, नरेंद्र कोल्हे, पुरुजीत चौधरी, नितीन चौधरी, उमेश बेंडाळे, राकेश फेगडे, किरण चौधरी, अनिल नारखेडे, शेखर चौधरी, नरेंद्र चौधरी, जयश्री चौधरी, वसंत चौधरी, नितीन नेमाडे, हर्षल पाटील, आमदार राजू मामा भोळे, संजय सावकारे, खासदार रक्षाताई खडसे, खा उन्मेष पाटील, नंदू महाजन, सुरेश धनके, प्रहाद पाटील, पदमाकर महाजन, यावल शहर अध्यक्ष निलेश गडे, पी एस सोनवणे, जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत, प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.