जळगाव (प्रतिनिधी) आज मध्यमिक व प्राथमिक शाळांचे निकाल जाहीर करण्यात आले. मात्र, आर.आर. विद्यालयात ५ वी ते ९ वीच्या विध्यार्थ्यांना निकालपत्र न देताच परत पाठविण्यात आल्याने पालकांनी नाराजी की व्यक्त केली आहे.
मुख्याध्यापकांची सही नसल्यामुळे शाळेने प्रगतीपत्रक वाटप केले नाही. केवळ मोबाईलमध्ये पालकांनी फोटोकॉपी देण्यात आल्या.तर दुसरीकडे पाचवी च्या विद्यार्थ्यांच्या “फि’चा घोळ झाल्याने विद्यार्थ्यांचे निकालपत्राची फोटोकॉपीही दाखविण्यात आली नाही. त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला होता. यावेळी पालक, आणि संस्थाचालक यांच्यात वाद उत्पन्न झाला. मुख्याध्यापकाची सही नसल्यामुळे आम्ही हे निकालपत्र देवू शकत नाही. असे शिक्षकांनी पालकांना सांगितले. यावेळी मोबाईलमध्ये फोटोकॉपी काढून घेण्यास सांगण्यात आले. परंतु काही पालकांनी मोबाईल न आणलेल्या त्यांची तारांबळ उडाली. या फतव्याने विध्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन गोंधळात भर पडला. तर काहींनी मोबाईल आणला नसल्याने कागदावर आपला विषय निहाय निकाल उतरवून घेतला. इयत्ता पाचवीत प्रवेश घेतांना १८०० रुपये फि भरावी लागते. त्यावेळी तत्कालीन मुख्याध्यापकांनी या फिचा कोणताही हिशेब दिलेला नसल्यामुळे ही फि भरली आहे किंवा नाही याची माहिती या अर्जाव्दारे पालकाकडून भरून घेण्यात येत आहे. दरम्यान शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक जयांशू पोळ यांनी राजीनामा सादर केला आहे. मुख्याध्यापक पोळ यांची तब्बत बरी नसल्यामुळे ते कारभार सांभाळण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले