नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | कतरमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आठ माजी नौसेना अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारत सरकारच्या याचिकेनंतर आठ जणांच्या मृत्यूच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भारत सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, माजी नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेप्रकरणी कतार कोर्टाचे दरवाजे भारत सरकारने ठोठावले होते. भारताने याप्रकरणी याचिका दाखल केली होती. कतार कोर्टाने माजी नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी केल्याची माहिती आहे. कायदेशीर टीम अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी संपर्कात आहे. कोर्टात सुनावणीवेळी भारतीय राजदूत आणि अधिकारी कोर्टात उपस्थित होते.