Home राज्य पुणतांब्यातील कृषी कन्यांचे आंदोलन मागे

पुणतांब्यातील कृषी कन्यांचे आंदोलन मागे

0
28

नगर प्रतिनिधी । पुणतांबा येथे कृषी कन्यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज दुपारी मागे घेण्यात आले.

शेतकर्‍यांशी संबंधीत विविध मागण्यांसाठी पुणतांबा येथील तीन कृषी कन्यांनी गत पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. काल रात्री यातील तिन्ही मुलींना बळजबरीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, आज सकाळी कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुणतांबा येथे जाऊन उपोषणकर्त्या मुलींची भेट घेतली. सरकार त्यांच्या सर्व मागण्यांवर विचार करणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर या मुलींनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound