मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासन व पोलीस कर्मचारी यांच्याकडून विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना ने थैमान घातले आहे कोरोना वाढत असतानाही लोक मास्क घालत नसल्याचे चित्र आहे त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुक्ताईनगर नगरपंचायत कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने विना मास्क धारकांवर आज मुक्ताईनगर येथे कारवाई केली त्यात 25 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 2800रुपये दंड वसूल करण्यात आला या कारवाईमध्ये नगर पंचायत कर्मचारी सचिन काठोके, सुनील चौधरी ,गणेश कोळी राहुल पाटील ,रोहित महाजन ,तसेच पोलिस कर्मचारी मोजेस पवार, विशाल पवार ,अविनाश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.