वर्धा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात पीडित प्राध्यापिकेच्या द्वितीय स्मृतिदिनालाच हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान ‘सदर खटला मीडियात चालला व पुरावे नसताना आरोपीला दोषी ठरविण्यात आलं’ असं विधान करत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू असं हा आहे. आज खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय मिळाला, असं म्हणता येईल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या या निकालाची माहिती दिली
याविषयी अधिक माहिती अशी की, “दि.३ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान १० फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता.” आरोपी विकेश नगराळे याने एकतर्फी प्रेमातून प्रा.अंकिता पिसुंडे यांना जिवंत जाळलं होतं. आजच्याच दिवशी या जळीतकांडात होरपळून पीडितेनं अखेरचा श्वास घेतला होता. या प्रकरणी दोषी असलेल्या विकेश नगराळेच्या शिक्षेवर आज सुनावणी पार पडली. आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्यानंतर त्याला न्यायालयाने दोषी ठरवत दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने निकाल दिला असला तरी आम्ही यावर समाधानी नसल्याचं पीडितेच्या कुटुंबियांची म्हणत या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होणं अपेक्षित होतं” असं म्हटलं आहे
या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. या प्रकरणी ४२६ पानांचं दोषारोपपत्र, ६४ सुनावणी, २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला २ वर्ष पूर्ण होताना काल हा निकाल दिला जाणार होता. परंतु, आता दोषी विकेशच्या शिक्षेवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान, या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.