नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, या हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टां स्थगिती दिली आहे. सार्वत्रिक निवडणुकीला आता थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळं पोटनिवडणूक नको, असं सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देताना म्हटलं आहे.
यावेळी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच पुढील सुनावणी सात आठवड्यांनी घेण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. पण सात आठवड्यांनी सुनावणी होईपर्यंत निवडणुका जाहीरही होण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही ! सुप्रीम कोर्टाचा निर्णय
12 months ago
No Comments