Home राज्य पुनाळेकर व भावेला १ जूनपर्यंत कोठडी

पुनाळेकर व भावेला १ जूनपर्यंत कोठडी

0
35

69504590

मुंबई (वृत्तसेवा ) ‘सनातन संस्थे’चे वकील संजीव पुनाळेकर व त्यांचे सहकारी विक्रम भावे या दोघांनाही पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयानं १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी सीबीआयनं मुंबईतून अटक केली आहे.

 

रावे नष्ट केल्याचा आरोप

नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात ते मॉर्निंग वॉक करत असताना जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे या दोघांना आधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत जी माहिती समोर आली त्याआधारे पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे. नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटकेत असेल्या शरद कळसकरच्या तपासातून सचिन अंदुरेचे नाव पुढे आले होते. पुनाळेकर व भावे या दोघांना सीबीआयनं मुंबईतून अटक केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप या दोघांवर आहे. दाभोलकर हत्या प्रकरणी खटल्यात आरोपींच्यावतीने संजीव पुनाळेकर व त्यांचा सहकारी भावे हे न्यायालयात बाजू मांडत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound