नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता, असा आरोप काँग्रेस नेत्याने केल्यामुळे प्रचंड खळबळजनक उडाली आहे.
पुलवामा हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याचा देशभरातून निषेध नोंदवण्यात आला. आता या हल्ल्यावरून राजकारण रंगत आहे. काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी हा हल्ला फिक्स होता असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी छुपी हातमिळवणी केली आहे. या दोघांची हातमिळवणी नसती तर हा हल्ला होऊच शकला नसता असेही हरिप्रसाद यांनी म्हटले आहे. काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत बी. के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हा गंभीर आरोप केला आहे.