नाशिक (वृत्तसंस्था) सध्याची तरुण पीढी अतिशय संवेदनशील आहे. बंडखोर तरीही भावनाप्रधान अशा पौगंडावस्थेतील मुलांच्या मनातील कल्लोळाचा वेध घेणाऱ्या नाशिक येथील लेखिका स्वाती विनय गानू टोकेकर यांच्या ‘ मुलांच्या मनात डोकावताना ‘ या पुस्तकाचे दिनांक 16 मे रोजी प्रसि्ध्द शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते मराठी साहित्य परीषद हॉल, पुणे येथे होणार आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून मिलींद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे उपस्थित राहणार आहेत.
डॉ.स्वाती विनय गानू टोकेकर या गेली 20 वर्ष उपमुख्याध्यापिका व मुख्यध्यापिका सोबत जवळपास 34 वर्ष शिक्षणक्षेत्रात कार्यरत असतांना प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डी.एड अशा सर्व पातळयांवर शिक्षक म्हणून काम केलेले आहे. नाशिक आणि पुणे आकाशवाणी वर समुपदेशनात्मक व कथाकथनाचे कार्यक्रम. सकाळ, लोकमत,महाराष्ट्र टाईम्स, देशदूत, गावकरी, लोकसत्ता, आपलं महानगर सारख्या वर्तमान पत्रात त्यांनी सदर चालवलेली आहेत. आता पर्यंत त्यांची ‘ तोल सांभाळताना’ ‘प्रश्न उमलत्या वयाचे ‘ ‘सानिका व्याकरणमाला’ ‘सानिका बंधमाला आदी पुस्तक प्रकाशीत झालेली आहेत. सदर कार्यक्रम मराठी साहित्य परीषद हॉल, पुणे येथे सा्यंकाळी 6 वाजता होणार आहे. तरी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे वैशाली प्रकाशन पुणे यांच्या वतीने विलास पोतदार यांनी कळविले आहे.