Home Cities जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासात्मक वचननामा प्रकाशित

राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासात्मक वचननामा प्रकाशित


4d9d8fa9 c1d1 4e99 a39f ea3a042720cd

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या वतीने मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ”असे असेल आपले जळगाव” या स्वरुपाच्या विकासात्मक वचननामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज (दि.१६) प्रकाशित करण्यात आला.

 

याप्रसंगी रा.कॉ. चे जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे, करण खलाटे, जिल्हाध्यक्ष भैय़्यासाहेब रविंद्र पाटील, अल्पसंख्यक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फारभाई मलिक, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप सोनवणे, शिरीष चौधरी, पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रवक्ते योगेश देसले, युवक महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, लिगल सेल जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, कार्यालयीन सचिव संजय चव्हाण, दीपक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound