पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पारोळा येथे संपन्न झाले. ग्राहक पंचायत संस्थेचे संस्थापक स्व. ना. बिंदू माधव जोशी यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या या दिनदर्शिकेचे वितरण ग्राहक परिवारात करावयाचे आहे.
या प्रकाशन कार्यक्रमात तहसीलदार अनिल पाटील आणि पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
कार्यक्रमास पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवकुमार निरगुडे, पुरवठा अधिकारी व्ही. व्ही. गिरासे, जळगांव जिल्हा सहसंघटक भूपेंद्र मराठे, तसेच अन्य जिल्हा सदस्य उपस्थित होते. दिनदर्शिकेत, राष्ट्राच्या सामाजिक आणि नैतिक उन्नतीसाठी योगदान दिलेल्या नेत्यांचा परिचय दिला आहे, ज्यावर पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी समाधान व्यक्त केले.