कंत्राटी भरतीच्या निर्णयाच्या विरोधात नोंदविला निषेध; परिसरात जोरदार घोषणाबाजी
पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षातर्फे जाहिर रोष व्यक्त करण्यात आला.
तत्कालीन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. त्यांनी घेतलेल्या त्या निर्णयाचे खापर विद्यमान सरकारवर फोडले जात असल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा येथील भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारत तसेच निषेध असो निषेध असो, महाविकास आघाडीचा निषेध असो, “लाखों तरुणांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध असो” अशा जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, ज्योती चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, शहर अध्यक्ष रमेश वाणी, पंचायत समितीचे मा. सभापती बन्सीलाल पाटील, संजय पाटील, रविंद्र पाटील, दीपक माने, समाधान मुळे, जगदीश पाटील, शरद पाटील, प्रज्ञावंत आघाडीचे सुनील पाटील, योगेश माळी, राहुल गायकवाड, भैया ठाकूर, विरेंद्र चौधरी, रिंकू जैन, रमेश शामनानी, टिपू देशमुख, रहीम बागवान, विनोद पवार, शहाजी बावचे, रामा जठार, हेमंत पाटील, आकाश लांडगे, नकुल पाटील बबलू मराठे यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.