जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या अधिकृत उमेदवार पुष्पा महाजन यांच्या प्रचारार्थ नशिराबाद येथे जाहीर सभा घेण्यात आली.
या सभेत नशिराबादच्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेना शाखाप्रमुख व कार्यकर्ते दीपक माळी, गणेश देशमुख, पप्पू महाजन, निवृत्ती महाजन यांचा समावेश होता. राज्यात आज अनेक समस्या आहेत. त्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या समस्या, महागाई, भ्रष्टाचार यामुळे सामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत. मतदारसंघात विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. यावर मान्यवरांच्या बोलण्यातून भाष्य करण्यात आले. माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांनी केलेली विकासकामे व विद्यमान मंत्री यांनी दिलेली पोकळ आश्वासने याचा न्यायनिवाडा जनता जनार्दन करेलच, असे विधान आघाडीचे नेतेमंडळींनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले आहे.
महाजन यांचे व्हिजन
आघाडीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांनी आपल्या विकासाचे व्हिजन जनतेसमोर ठेवले. तरुणांसाठी जिम, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व हॉस्टेल, बेरोजगार युवकांसाठी विविध औद्योगिक प्रकल्प, शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या योजना, मतदारसंघात रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा, महिलांसाठी बचतगट व रोजगाराच्या संधी अशा विविध मूलभूत प्रश्नांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. तसेच जनतेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असेही त्या म्हणाल्या. आघाडीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांना मतदान करून प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, जळगाव ग्रामीणमध्ये परिवर्तन करून आपल्या सेवेची संधी द्या, असे आवाहन उपस्थितीत मंडळींनी केले.
सभेस उपस्थितीत
सभेला अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हाजी मलिक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवानेते विशाल देवकर, नशिराबाद येथील सरपंच विकास पाटील, माजी जि.प.सदस्य पंकज महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील, राष्ट्रवादी धरणगावचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, काँग्रेसचे जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, राष्ट्रवादी महिला तालुक अध्यक्षा जळगाव संगीता बोंडे, माजी जि.प.सदस्य रविंद्र पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती एन.डी.पाटील, राष्ट्रवादी डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, शिवव्याख्याते लक्ष्मण पाटील, धरणगाव तालुका राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष मनोज पाटील होते.
सभेचे अध्यक्ष मंडळी
सभेच्या अध्यक्षस्थानी माळी पंच मंडळाचे खालच्या अळीचे अध्यक्ष जनार्दन माळी होते. त्याचबरोबर व्यासपीठावर माळी पंच मंडळाचे वरच्या अळीचे अध्यक्ष सुनिल शास्त्री महाराज, नशिराबादचे ग्रामपंचायत सदस्य त्यामध्ये देवेंद्र पाटील, नामदेव माळी, प्रकाश महाजन, डिगंबर रोटे, नजीब अली, सत्तार पहेलवान, संजय भोई हे होते. तसेच शालिक पाटील, सांडू पहेलवान, युसुफ शेठ, नुरा पेंटर आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिराबाद येथील गावकारी
सभास्थळी विविध गावांचे आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध फ्रंटलचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक बंधू-भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी केले.