धरणगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी या ठिकाणी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती.
युती सरकारच्या काळात सामान्य जनतेचे होणारे हाल आणि खोट्या आश्वासनांची खैरात करण्यात आली असल्याची टीका करण्यात आली. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कामाची तुलना करून सांगितले गेले की, मतदारसंघाचा विकास कसा खुंटला आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आघाडीच्या उमेदवार पुष्पाताई महाजन यांना मतदान करून प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले. पाळधी येथील सभेला अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक , राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवानेते विशाल देवकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील, राष्ट्रवादी धरणगावचे तालुकाध्यक्ष धनराज माळी उपस्थित होते. तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. यात काँग्रेसचे जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, धरणगाव काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा अरुणा कंखरे, धरणगाव राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा शोभा पाटील, नशिराबादचे सरपंच विकास पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, माजी जि. प. सदस्य रविंद्र भिलाजी पाटील, माजी जि. प. सदस्य पंकज महाजन उपस्थित होते. त्याच्यासोबत मार्केट कमिटीचे माजी सभापती एन. डी. पाटील, ग्रंथालय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदजी देवरे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, राष्ट्रवादी धरणगावचे शहराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादी धरणगावचे युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, आव्हाणीचे ईश्वर पाटील, आमोद्याचे छोटू सरकार, अल्पसंख्याक सेलचे धरणगाव तालुकाध्यक्ष श्रावण बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. सभास्थळी विविध गावांचे आजी – माजी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध फ्रंटलचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी केले.