अमळनेर (प्रतिनिधी) येथे दरवर्षि संत सखाराम महाराज यांच्या जयंती निमित्त यात्रा भरत असते. सदर यात्रेच्या काळात पालखी व रथाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरीक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे ग्रामिण भागातील लोकांपर्यंत विधी सेवेबाबतच्या योजनांची माहिती व सेवा पोहचविण्यासाठी विधी सेवा समितीने कायदयाविषयी जनजागृती उपक्रम नुकताच राबविला.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश – १ राजीव पु. पांडे यांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर वकिल संघ तसेच समांतर विधी सेवक यांच्या मार्फत दी. १८ मे आणि १९ रोजी हा उपक्रम राबविण्यात आला होता. ग्रामिण भागातील लोकांपर्यंत विधी सेवेबाबतच्या योजनांची माहिती व सेवा पोहचविण्यासाठी सखाराम महाराजांच्या समाधीजवळील पोलीस चौकीलगत तालुका विधी सेवा समितीने प्रकरण तडजोडीबाबत तसेच मोफत विधी सेवा,लोकन्यालयात खटले दाखल करणे बाबत माहिती दिली. त्याकामी अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष तथा सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल, सभासद अॅड. आर. एस. माळी व समांतर विधी सेवक वैशाली विजय पाटील आणि संदीप भाईदास पाटील तसेच तुषार एस. पवार यांनी परिश्रम घेत मार्गदर्शन केले.