पीक विम्यासह शेतकर्‍यांचे विविध प्रलंबित अनुदान द्या-राष्ट्रीय किसान कॉंग्रेस

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पीक विमाना आणि शेतकर्‍यांचे प्रलंबीत अनुदान तातडीने द्यावे अशी मागणी राष्ट्रीय किसान कॉंग्रेसने केली असून याचे निवेदन कृषी अधिकार्‍यांनी देण्यात आले आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मागण्या लवकरात लवकर मंजूर करून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढा. खरीप हंगाम २०२३- २४ मध्ये ज्या महसूल मंडळात पावसाचा खंड पडून दुष्काळ पडला अशा मंडळांना उर्वरित ७५% पीक विमा लवकरात लवकर मिळावा. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ तसेच रोगराईमुळे शेतकर्‍यांच्या हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली होती त्या अनुषंगाने सदरील पिक विमा कंपनीने पंचनामे देखील केलेले होते तरी अशा शेतकर्‍यांच्या लवकरात लवकर पिक विमा मिळावा.

यात पुढे नमूद केले आहे की, सन २०२३ मध्ये जिल्ह्यातील सर्वच मंडळाकडे तापमान ४५ डिग्री पेक्षा जास्त झाल्याने जिल्ह्यातील फळ बागायतदार केळी शेतकर्‍यांना हवामान आधारित पिक विमा लवकरात लवकर मिळावा. अमळनेर तालुक्यातील ८ ही मंडळात २०२१ -२२ मध्ये अतिवृष्टी अवकाळी व गुलाबी वादळामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावून घेतला गेला होता . शासनाने शेतकर्‍यांना अनुदान देऊ अशी घोषणा केली होती.परंतु आजतागायत वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही तरी आपल्या स्तरावरून लवकरात लवकर लक्ष देऊन सदर शेतकर्‍यांना अनुदान मिळावे. यासोबत, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने जाहीर केले प्रमाणे हेक्टरी अनुदान मिळावे. मागील महीन्यात झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशी मागणी यात करण्यात आली आहे.

वरील सर्व मागण्याची निवेदन तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर देण्यात आले आहे.१५ दिवसाच्या आत न्याय मिळवून न दिल्यास किसान काग्रेस च्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा या निवेदनात देण्यात आले आहे. याप्रसंगी राष्ट्रीय किसान कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष सुकलाल पाटील, राष्ट्रीय किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेश पिरन पाटील, पंचायत समिती माजी सभापती धनगर दला पाटील, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथील अनिल शिंदे, राष्ट्रीय किसान कॉंग्रेस तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांची उपस्थिती होती.

Protected Content