यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरांमध्ये नगर परिषदच्या माध्यमातुन होणारा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा हा पाच ते सहा दिवसात होत आहे. नागरीकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असतांना ऐन दिवाळी सारख्या सणांमध्ये सुद्धा शहराला भेडसावणाऱ्या पाणीपुरवठ्याची टंचाई जाणवत आहे. पाच ते सहा दिवसांमध्ये होत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली ही समस्या सोडवण्यासाठी शहरवासीयांनी अनिल चौधरी प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख यांच्याकडे ही समस्या ठेवली. त्यांच्या कानावर टाकली.
या समस्येची दखल घेत तात्काळ अनिल चौधरी यांनी नागरिकांच्या समस्या व भावनांचा आदर करीत तात्काळ नगर परिषद प्रशासनाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून यावल शहरवासीयांना रोज पाणी द्या त्यातही अडचणी असतील त्या मला सांगा मी सोडवतो पण ही पाण्याची समस्या सोडवा आणि न सोडवल्यास हा विषय ही गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही जे दुर्लक्ष करत असतील, अशा अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून कार्यवाही होईल अशी सूचना देऊन संबंधित नगर परिषदच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मान्य केले. ह्या या अनिल भाऊ चौधरी यांच्या समय सूचकता व नागरिकांप्रती समस्येची जाण असल्यामुळे यावल शहरवासीयां कडून अनिल चौधरी यांनी नागरीकांना नियमित मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले जात आहे.