भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील फेकरी येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राला जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसन समितीने आज (दि.३०) केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.
या प्रकल्पग्रस्तांना शासनाने कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्या, सध्या त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून तात्पुरत्या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, पण त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह नीटपणे होत नसल्याचे समितीने म्हटले आहे. आज या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी आज या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बाबुराव सोनवणे, सचिव सुभाष त्र्यंबक झांबरे, सहसचिव आसाराम आवसू भिरुड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.