रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील भाजप गोटात आज दिवसभर एकच चर्चा रंगली — “वरून आदेश आला म्हणून आंदोलन केले” असे सांगणारा तो पदाधिकारी नक्की कोण? काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि थेट प्रतिआक्रमण केले.

पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, “रावेर तालुक्यातील एका भाजप पदाधिकाऱ्याशी माझ बोलण झाल.आंदोलन का केलं असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं की ‘भाऊ, वरून आदेश आला म्हणून केलं.’”

खडसेंच्या या वक्तव्यानंतर तालुक्यात राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे. आदेश देणारे ‘वरचे’ नेमके कोण? आणि ‘आदेश पाळणारा’ तो पदाधिकारी कोण? यावर सध्या सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
राजकीय वातावरण तापले असून, भाजपच्या अंतर्गत चर्चांना चांगलाच उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढचा अंक कोणता, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



