चाळीसगाव (प्रतिनिधी) जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहरात विविध सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध नोंदवत ‘जैश-ए-मोहम्मद’संघटनेचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.
जम्मू-काश्मीरमधील पुलगाव क्षेत्रात भारतीय जवानांच्या वाहनावर पाकिस्तानी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत. या घटनेचा संपूर्ण देशभर तीव्र निषेध होत असताना चाळीसगावातील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याचा जाहीर निषेध केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या ‘जैश ए मोहम्मद’ या संघटनेचा प्रतिकात्मक पुतळ्याचे आज दहन करण्यात आले. तसेच नागरिकांनी निषेधाच्या घोषणा देखील दिल्यात. यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, खुशाल पाटील, रयत सेनेचे गणेश पवार, वसुंधरा फाउंडेशनचे सचिन पवार, सह्याद्री प्रतिष्ठानचे शरद पाटील, अजय जोशी तसेच सामाजिक कार्यकर्ते उदय पवार अविनाश काकडे, दिवाकर महाले, बंडू पगार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पहा– पुलवामा हल्ल्याबाबत चाळीसगावातील निषेध.