पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पहुर शहर पत्रकार संघटनेतर्फे पोलिस स्टेशनला लेखी निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला.
पहूर येथे दोन दिवसापूर्वी दोन गटात हाणामारी होऊन 48 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी येथील पत्रकार गेले असता त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. त्या संदर्भात पहुर शहर पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांच्या वतीने पहूर पोलीस स्टेशनला निषेध म्हणून लेखी निवेदन देण्यात आले.
याप्रकरणी पहूर पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेऊन चौकशी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली यावेळी सर्व पत्रकार बांधव आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.