दिल्लीनंतर लखनऊ-हैदराबाद येथे नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन

lucknow college 1

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आता दिल्लीपाठोपाठ लखनऊ-हैदराबाद येथील विद्यार्थी सोमवारी सकाळी पुन्हा रस्त्यावर उतरले आणि निदर्शने करण्यास सुरूवात केली. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहचले असून पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मोठया जमावाला कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच रोखून धरले आहे.

कॉलेजच्या आतमधून पोलिसांवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, दगड फेकले जात आहेत. जामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी नादवा कॉलेजमध्ये हे विरोध प्रदर्शन सुरु आहे. नादवा कॉलेजमधील विद्यार्थी रात्री उशिरा घोषणाबाजी करत बाहेर येताच पोलिसांनी या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आवाराच्या आतमध्ये पाठवले. या कॉलेजबाहेर रात्रीपासून तणावाची स्थिती आहे.

Protected Content