यावल येथे महागाई विरोधात निषेध ; काँग्रेस महिलांकडून चुल पेटवा आंदोलन

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाजी पटोले यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे इंधन दरवाढ विरोधात निषेध करण्यात आला असून महिलांनी रस्त्यावर चुल पेटवा आंदोलन केले आहे. 

येथील कॉंग्रेस कमेटीच्या वतीने केन्द्र शासनाच्या भोंगळ व गोंधळलेल्या कारभारामुळे सर्व जीवनाश्यक वस्तुंच्या किंमती ह्या गगनाला जावुन भिडल्या असुन , देशातील सर्वसामान्य नागरीकांचे जगणं हे कठीन झाले आहे. आज यावल पंचायत समितीच्या प्रवेशव्दारा समोर  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ .नानाजी पटोले यांच्या आदेशाने  जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यावल रावेर तालुक्याचे आ. शिरीष चौधरी, जिल्हा परिषद गटनेते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महीलांनी रस्त्यावर आपली चुल पेटवा आंदोलन केले आणि नरेन्द्र मोदी सरकारच्या निषेर्धात जोरदार घोषणाबाजी करून महागाई विरोधात चुलीवर पोळी, भजे, चहा असा इतर स्वयंपाक करून  सर्वच महिलांनी निषेध व्यक्त केला. 

यावेळी आमदार शिरीष चौधरी ,प्रभाकरअप्पा सोनवणे यांनी मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरआपल्या शैलीत देशात वाढलेल्या भरमसाठ महागाईच्या निषेर्धात आपल्या भाषणातून चौफेर जोरदार हल्ला चढवला आंदोलनास सुरू असतांना सर्वसामान्य नागरीकांनीही उपस्थित राहुन आंदोलनास पाठींबा दर्शवला.

या आंदोलनात इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, काँग्रेस पक्षाच्या अनुसुचित जाती विभागाच्या  जिल्हाउपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे, शहराध्यक्ष कदीर खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, युवानेते वाढोड्याचे तरुण सरपंच संदीप सोनवणे, कोरपावलीचे युवा सरपंच विलास अडकमोल, महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी,नगरसेवक गुलाम रसूल हाजी गुलाम दस्तगीर, मनोहर सोनवणे, समीर खान, समीर मोमीन, बशीर तडवी, शेतकी संघाचे संचालक अमोल सुर्यकांत भिरुड, काँग्रेस पक्षाचे शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, नईमभाई शेख, काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, सकलेन शेख, अय्युब खान, मंजूर खान,रहेमान खाटीक, विजय बंडू गजरे,विक्की गजरे, अरुण तायडे, शेख आसिफ, अभिषेक इंगळे, निसार भाई, बबलू गजरे, भूषण कोळी, लीलाधर सोनवणे, भैय्या अडकमोल, भीमराव इंधटे, अजय बढे,

महिला भगिनी दुर्गा सोनवणे, सिंधु तायडे, पद्माताई तायडे, रजनीताई तायडे, अरुणाताई तायडे, शरिफाताई तडवी, सकिनाताई तडवी, शाहानुरताई तडवी, रुस्तुलताई तडवी, सरोजताई तडवी, नशिबाताई तडवी सहित असंख्य महिला पुरुष युवक आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content