देशातील वाढत्या असहिष्णूते विरोध भारत बंदचा इशारा (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भाजपाद्वारे देशाची एकता व अखंडता संपुष्टात आणण्याच्या नीती अंतर्गत वाढत्या असहिष्णूतेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चातर्फे उद्या शनिवार दि. २५ जून रोजी भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

देशामध्ये धार्मिक द्वेष व तेढ निर्माण करून असंतोष, दंगली व जाळपोळ घडवून आणण्यात येत आहेत. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आरएसएस व भाजपा पक्षाकडून धार्मिक ध्रुवीकरणाचे काम सुरु असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आरएसएस व भाजपा पक्षाकडून धार्मिक मुद्द्यावर असंतोष निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या कारणामुळे देशाची एकता व अखंडता टिकून रहावी या करिता संपूर्ण देशभर या विरोधात आंदोलन निदर्शन व निषेध करण्यात येणार आहे.
दि. २५ जून २०२२ रोजी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात ‘भारत बंद’चे आयोजन करण्यात आले आहे. वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध संघटनांनी भारत बंदला प्रतिसाद व सक्रिय सहभाग दर्शविला आहे. हे सर्व मुद्दे जनसामान्य ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांक मूलनिवासी बहुजन समाजाच्या सामाजिक व देशाच्या एकता याचे असल्याने या आंदोलनात विविध सामाजिक समूह संघटना नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
तरी सर्व नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाद्वारे करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला रवींद्र लाळगे , सुरेश ठाकूर, राजूभाऊ खरे, विजय सुरवाडे, अमजद भाई रंगरेज, पंकज सोनवणे, सुनील देह्डे आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1066510964278744

Protected Content