कोलकाता वृत्तसंस्था । नागरिकत्व कायदा (सीएए) सरकारने एका रात्रीत बनविला नाही. यावेळी विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, राजकीय लोक मुद्दाम याला समजून घेत नाहिये. सीएएबद्दल लोकांची दिशाभूल केली जात आहे. युवा नागरिकत्व कायदा समजू शकतात, परंतु ज्यांना यावर राजकारण करायचे आहे त्यांना ते समजणार नाही. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बेलूर मठातील लोकांना संबोधित करताना सांगितले.
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकातातील बेलूर मठ येथे या कायद्याबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, हिसकावून घेणारा नाही. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला आहे. मात्र, काही राजकीय पक्ष जाणूनबुजून समजावून घेत नाही. हा कायदा लागू झाल्यानंतर अल्पसंख्याकांवर अत्याचार का केले, याचे उत्तर पाकिस्तानला द्यावे लागेल, असे मोदी म्हणाले. ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तरुणांच्या मनात या कायद्याबाबत शंका निर्माण केल्या आहेत. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरूणांना समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे,’ असेही मोदी म्हणाले.