धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे पक्षकारांकडून ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड.मनीषा आढाव या दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ धरणगाव वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत, आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि वकील संरक्षण कायदा मंजूर करा अशी मागणींचे निवेदन सोमवारी २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, न्यायालयातील वकील हे पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी परिश्रम घेत असतो. यावेळी काम करत असताना अनेकदा विरुद्ध बाजूच्या पक्षकारांकडून धमक्या मिळतात. त्यामुळे देखील आम्ही कोणतीही भीतीने वाळगता वकिली व्यवसाय करत असतो. २५ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव या दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे हत्या करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करत त्यांना फाशी देण्यात यावी तसेच वकील संरक्षण कायदा देखील मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी धरणगाव वकील संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी धरणगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर. एस. पाटील, ॲड. संजय महाजन, ॲड. बी के आवारे, ॲड. राजेंद्र येवले, ॲड. शरद माळी, ॲड. राहुल पारेख, ॲड. संजय शुक्ला,ॲड. आर, एस शिंदे, ॲड. सी झेड कटारे, ॲड. संदीप सुतारे, ॲड. संदीप पाटील, ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. सागर बाजपेयी, ॲड. असिफ कादरी, ॲड. हर्षल चव्हाण,ॲड. प्रशांत क्षत्रिय, ॲड. कुलदीप चंदेल, ॲड. अजय बडगुजर, ॲड. प्रदीप पाटील, ॲड. इजराइल, ॲड. डी.ए. माळी इत्यादी उपस्थित होते.