लखनऊ (वृत्तसंस्था) आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचार बंदी घातली होती. आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान . भाजपाच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केल्यामुळे आणि मुस्लिमांना धमकावल्याबद्दल मेनका गांधी यांच्यावरही प्रचार बंदी आणण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने आझम खान यांच्यावर कारवाई करताना 72 तासांची प्रचारबंदी केली आहे. ही बंदी मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. तर मेनका गांधी यांच्यावर 48 तासांची बंदी घालण्यात आली आहे. मेनका यावेळी सुल्तानपूरमधून उमेदवार आहेत. जातीयवादी विखारी प्रचार करून प्रचाराचे वातावरण कलुषित केल्याबद्दल निवडणूक आयोगाने सोमवारी भाजपचे ‘स्टार प्रचारक’ व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व बसपच्या प्रमुख मायावती यांची शब्दांत निर्भत्सना करत, यांच्यावर प्रचारबंदी लागू केली. दरम्यान,लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी ओलांडली आहे. भाजपाच्या हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम शिवीगाळ केली आहे.