Home Cities जळगाव प्रा. शेख मोईन यांना ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड जाहीर

प्रा. शेख मोईन यांना ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड जाहीर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. शेख मोईन शेख नईम यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड – २०२६’ जाहीर झाला आहे. भव्या फाउंडेशन, जयपूर (राजस्थान) यांच्या वतीने दरवर्षी हा सन्मान प्रदान करण्यात येतो.

फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. निशा माथुर व संचालक शैलेन्द्र माथुर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी केलेले संशोधन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम तसेच समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन प्रा. नईम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार समारंभ ५ एप्रिल २०२६ रोजी जयपूर येथे भव्य कार्यक्रमात आयोजित करण्यात येणार असून, या सोहळ्यास देशभरातील प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रा. नईम यांनी आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडून येत आहेत.

दरम्यान, या पुरस्कार घोषणेनंतर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound