प्रा.शैलेजा पाटील यांना पीएच.डी. प्रदान


अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गलवाडे येथील माहेर असलेल्या व शिरपूर (जि.धुळे) येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या प्रा.शैलेजा पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विद्याशाखेअंतर्गत डॉक्टरेट पदवी नुकतीच कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांच्या हस्ते देण्यात आली, यावेळी परिक्षक प्रा.डॉ.पी.के.अजमेरा (BITS पिलाणी,राजस्थान) उपस्थित होते.

 

प्रा.पाटील यांनी Video-Based Face Recognizion या विषयावर डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. या कामी त्यांना त्यांच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील,सौ.हिराबाई पाटील, अर्जुन पाटील,सौ.सुभद्रा पाटील, आनंदराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रा.शैलेजा पाटील ह्या औरंगाबाद सा.बा. संकल्पचित्र विभागाचे उप अभियंता दिनेश आनंदराव पाटील यांच्या पत्नी आहेत.

Add Comment

Protected Content